“बाबांनो हात जोडून सांगतो, मी पंतप्रधानपदाचा दावेदार नाही…”

पटना | भाजप (BJP) आणि संयुक्त जनता दलाची (JDU) युती तोडत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपला मोठा धक्का दिला. भाजपला देखील हा धक्का अनपेक्षित होता.

त्यामुळे नितीश कुमार हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत का, अशा चर्चा सुरु झाल्या. पण त्यावर आता नितीश कुमारांनी स्पष्टीकरण दिले आहे.

बाबांनो मी हात जोडून सांगतो, मी पंतप्रधान (Prime Minister Post) पदाचा दावेदार नाही. तसेत यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ईडी (Enforcement Directorate) असो किंवा सीबीआय (CBI) आम्ही कोणाला घाबरत नाही.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. जनता त्यांचा बदला घेईल. आमचे महाविकास आघाडी सराकर मागे हटणार नाही, असे देखील कुमार म्हणाले.

संविधानानुसार (Constitution of India) देश चालतो. केंद्राने काय करायचे, राज्यांनी काय करायचे, हे संविधानाने ठरवून ठेवले आहे. सगळ्यासाठी घटनात्मक तरतुदी आहेत, असे कुमार पत्रकारांच्या प्रश्नावर म्हणाले.

बिहारमध्ये जंगलराज परत आल्याचे भाजप बोलत आहे. यावर कुमार म्हणाले, कोणी भाजपमधील लोक माझ्याबद्दल काही बोलले, तर त्यांचा त्यांच्या पक्षात फायदा होतो. आम्ही त्यांच्यावर बोलत बसणार नाही. आम्ही आमचे काम करत राहणार असल्याचे कुमार म्हणाले.

मला हा निर्णय घ्यावा लागला यामागे कारण आहे. आम्ही ज्या व्यक्तीला आमच्या पक्षात सर्वात जास्त अधिकार दिले, त्याने गडबड गोंधळ केला. तसेच पक्षातील अनेकांची ईच्छा होती आणि आम्ही युती तोडली, असे कुमार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही भूकंप?; ‘या’ दोन नेत्यांमुळे पवारांचं टेंशन वाढलं

गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना मोलाचा सल्ला, म्हणाले…

मोठी बातमी! भाजप प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची लागली वर्णी

‘अरे वा! मग शिवसेना माझीच’, उदयनराजेंचं मोठं वक्तव्य

“बंडाच्यावेळी शहिद झालो असतो”; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट