महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेत प्रवेश करणार का?, छगन भुजबळ म्हणतात…

AppleMark

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. शिवसेना प्रवेशाबाबत आता छगन भुजबळांनी मौन सोडलं आहे.

मी शिवसेनेत जाणार नाही. राष्ट्रवादीचा आहे आणि राहणार… असं म्हणत छगन भुजबळांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगितल आहे. 

माझा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने प्रकल्पाच काम पूर्ण होतं आहे. त्या प्रकल्पावरुन लक्ष विचलित करण्यासाठी कोणीतरी जाणून बजून या अफवा पसरवल्याचं छगन भुजबळ सांगितलं. 

27 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर सुरु होत्या. मात्र मी हातावरच घड्याळ काढून शिवबंधन बांधणार नाही, असं भुजबळांनी स्पष्ट केलं आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्याचे आमदार वैभव पिचड हे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्वादीला रामराम करत शिवबंधन बाधून घेतलं आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. 

सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

स्वार्थ आहे म्हणूनच ‘त्यांचे नेते’ भाजपमध्ये येतात; चंद्रकांत पाटलांची जाहीर कबुली

“साहेबांनी ज्यांना पुत्रवत प्रेम दिलं ते कधीच गद्दारी करणार नाहीत”

-राष्ट्रवादीला गळती; ‘हा’ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???

-लक्ष्मण मानेंचा ‘वंचित’ला दे धक्का; ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ची घोषणा

-आजारपणातून बरं होताच अकबरुद्दीन ओवैसींकडून ‘15 मिनिट’वाल्या वक्तव्याचा पुनरुच्चार

IMPIMP