औरंगाबाद महाराष्ट्र

विधानसभा निवडणूक लढवणार का??? अशोक चव्हाण म्हणतात…

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या काँग्रेसकडून मुलाखती सुरु आहेत. आमदार सुभाष झाम्बड हे या मुलाखतीसाठी पक्षनिरिक्षक म्हणून व्यासपीठावर हजर होते.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेदेखील मुलाखत घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांचा मतदारसंघ भोकरमध्ये मुलाखतीत त्यांनी मुलाखत दिली नसल्याची माहिती मिळत आहे. 

निवडणूक लढवण्यासाठीची पक्षाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तसेच मी स्वत: पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. मात्र पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूक लढवेन, असं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. 

अशोक चव्हाणांचा गड मानल्या जाणाऱ्या नांदेड मतदारसंघात त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागाला आहे. विशेषत: भोकर मतदारसंघात मोठा फटका बसला आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसणारे अशोक चव्हाण आता विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत आता चर्चांना उधाण आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-बीडचं रुप झपाट्यानं बदलणार; जयदत्त क्षीरसागरांचा विश्वास

-“राज ठाकरेंना कोणताच उद्योगधंदा नाही”

-“राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीमुळे शरद पवार जखमी”

-“काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचं दुध पिलंय का?”

-मुख्यमंत्री म्हणतात….युतीचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ फार्मुला जरा वेगळाच!

IMPIMP