पवारांच्या कौटुंबिक कलहात मला अजिबात रस नाही- उद्धव ठाकरे

मुंबई : मी राजकारण सोडणार नाही, मी शेती करणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या अजित पवार यांना उद्देशून लगावला. कर्माने मरणार त्याला धर्माने मारू नका, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.

जे जसे वागले त्यांच्यावर तशी स्थिती आली, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. त्याचवेळी पवारांच्या कौटुंबिक कलहात मला रस नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

हा महाराष्ट्र आहे, सुडाचे राजकारण कधीच सहन करणार नाही. आम्ही कोणाशी सुडाने वागणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, मी स्वतः शिवसेनाप्रमुखांना हातात हात घेऊन वचन दिलं आहे की एक न एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न पूर्ण करेन, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-