Uncategorized

विधानसभा निवडणूक लढण्याबाबत सुरेखा पुणेकर यांची मोठी घोषणा!

मुंबई |  आपल्या दिलखेचक अदाकारींनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी लाखो लोकांची मने जिंकली.  मात्र आता त्या सज्ज झाल्यात लावणीचा मंच सोडून राजकारणाच्या मंचावर येण्यासाठी! दस्तुरखु्द्द सुरेखा पुणेकर यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. 

पुढचा बाण माझा आता विधानसभेला लागेल, अशा शब्दात त्यांनी आपण विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं सांगितलं. सुरेखा पुणेकर यांना आता वेध लागलेत ते आगामी विधानसभा निवडणुकीचे! मी महाराष्ट्रासाठी खुप काही केलं आहे. कलावंत घडवले, जगवले. तंबूतली लावणी सभागृहात आणून ठेवली, अमेरिकेला नेली मग ती विधानसभेत गेली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

सुरेखा पुणेकर या नुकत्यात बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बिग बाॅसच्या घरातले अनुभव सांगितले. आणि त्याबरोबरच एका नव्या लढाईसाठी सज्ज असल्याचं घोषणा केली आहे.

दरम्यान, सुरेखा पुणेकरांना लोकसभेला पुणे मतदारसंघातून काँग्रेस तिकीट देणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. आता त्यांना कोणता पक्ष उमेदवारी देतो आणि त्या कोणत्या मतदारसंघातून लढतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IMPIMP