“मी अजूनही बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि शिवसेनेचा आमदार”

मुंबई | महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत.

ऐनवेळेला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची व देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला . मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंनी नुकतंच एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे.

या मुलाखतीत बोलताना एकनाथ शिंदेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तर मला मुख्यमंत्री करण्यात देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाटा असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदेंचा उल्लेख बंडखोर असा केला जातो. तर तुम्ही स्वत:ला कोण समजता, असा सवाल देखील एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला.

मी अजूनही बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. शिवसेनेचा आमदार आहे, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

दरम्यान, हे शिंदे सरकार नाही तर जनतेचं सरकार आहे. जे लोकांना हवं तेच आम्ही करणार, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

शिंदे सरकारची 4 तारखेला बहुमत चाचणी, मुख्यमंत्री म्हणतात…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

नीरज चोप्राने रचला आणखी एक इतिहास, मोडला स्वत:चाच विक्रम

काय सांगता? कोरोना व्हायरसमागे एलियनचा हात?, किम जोंग उनच्या दाव्याने खळबळ

सर्वांचं प्रेम जर क्वचित कुणाला लाभलं असेल तर मला लाभलंय- उद्धव ठाकरे