मी खूपच रोमॅन्टिक आहे, मला 3-4 मुलांची तरी आई व्हायचंय – भूमी पेडणेकर

मुंबई | बॉलिवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत आहेत. अनेक बडे कलाकार आपल्या चाहत्यांबरोबर आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असतात. अशाच चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकर.

भूमी नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कडू गोड गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतंच एका मुलाखतीत भूमीने बिनधास्तपणे संवाद साधला आहे. या मुलाखतीत भूमीनं लग्नाच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने ती चांगलीच चर्चेत आली आहे.

लग्नानंतर तुला किती मुलांची आई व्हायचंय, या प्रश्नावर उत्तर देताना भूमी म्हणाली की, मी लग्नावर विश्वास ठेवते. मी खूपच रोमॅन्टिक आहे. लग्नानंतर माझी इच्छा आहे की माझी 3-4 तरी मुले असावीत. भूमीच्या या बिनधास्त उत्तराने ती चांगलीच चर्चेत आली आहे.

तसेच या मूलखतीत भूमीने इतरही काही गोष्टी शेअर केल्या आहेत. ती म्हणाली की, लग्नाबद्दल माझे देखील काही विचार आहेत. या विचारांसोबत मी केव्हाच तडजोड करू शकत नाही. मला जर माझ्या आवडीच्या गोष्टी मिळाल्या तरच मी लग्न करणार आहे.

आपल्या लग्नाबद्दल आपल्या कुटुंबातील व्यक्तींना काय वाटतं हे देखील भूमीने यावेळी सांगितलं आहे. ती म्हणाली की, माझे आईवडील खूप सुधारलेले आहेत. लग्न ही एक अशी गोष्ट आहे की ती त्यांच्यासोबत चर्चा करू शकत नाही.

लग्नासाठी माझी वेगळी चॉईस राहिली आहे. लग्नाबद्दल माझे वेगळे विचार आहेत. माझ्या आईवडिलांना माझे लग्नाचे विचार नेहमीच मान्य असतील, असं देखील भूमीने यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, भूमीने सहा वर्षांपूर्वी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. ती एक अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर अगदी कमी वेळात इंडस्ट्रीत वेगळी छाप निर्माण केली आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारत ती नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान उंचावते.

महत्वाच्या बातम्या-

रणवीर आणि आलियाचा कीस करतानाचा ‘तो’ फोटो व्हायरल

नवरदेवाला पाहताच नवरी मंडप सोडून रस्त्यावर पळाली अन्…; पाहा व्हिडीओ

‘डिंपल लग्न करणार नाही तिला विक्रमच्या..’; शेरशाह विक्रम बत्रांच्या वडिलांचा खुलासा

“अर्जुनला इतकी मेहनत करताना पाहून वाटतं की सैफला सोडून त्याच्याशी लग्न करावं”

“सोशल मीडियावर नुसत्या फुलाचा फोटो शेअर केला तरी त्याला हस्तमैथुन…”