बाॅलिवूडमधील ड्रामा क्विन आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. ती चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट शेअर करत असते. अशातच सध्या राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्य़ा व्हिडीओमध्ये राखी भावूक झाल्याचं दिसून येत आहे. राखी सावंतने घराशी संबंधीत बऱ्याच गोष्टींचा उल्लेख व्हिडीओमध्ये पहायला मिळथ आहे.
राखीच्या घरी महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं. त्यांना त्यांची मतं मांडण्याचा देखील अधिकार नव्हता. अशा परिस्थितीत राखीनं सर्व बंधन तोडत आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. जेव्हा राखीला लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली तेव्हा अनेकांनी तिला नापसंती दर्शवली.
बॉलिवूड मध्ये काम करते, डान्स करते, तिचे चारित्र्य चांगले नसणार म्हणून आलेली स्थळ नकार द्यायची…राखी सावंत या सगळ्या गोष्टी राहुल वैदयला सांगत असताना भावूक झाल्याचे ही पाहायला मिळालं. राखीचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा जोरदार व्हायरल झाला आहे.
लहानपणीच राखीवर कुटुंबाची जबाबदारी पडल्यानं तिला 13 व्या वर्षीच कंपनीत काम कराव लागलं. त्यामुळे भरपूर मेहनत घेऊन ती आज इथपर्यंत येऊन पोहचली आहे.
दरम्यान, राखीनं बिग बॉसचा 14 वा सीझन तुफान गाजवला. एवढंच नाही तर ती टॉप 5 स्पर्धकांमध्येही पोहोचली होती. पण त्यानंतर 14 लाखांची रक्कम घेऊन राखी घरातून बाहेर पडली. बिग बॉसच्या घरातून बाहेप पडल्यानंतर राखी मागच्या काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देणाऱ्या आपल्या आईवर उपचार करून घेण्यात बिझी आहे. सोशल मीडियावरून तिनं आईसाठी प्रार्थना करा असं भावनिक आवाहन सुद्धा केलं होतं.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
आनंद महिंद्रा यांनी लसीकरणासंदर्भात नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ मागणी
‘पुढील पाच वर्षात देणार एक लाख लोकांना नोकऱ्या,’ ‘या’ अभिनेत्यानं केली मोठी घोषणा
राज्यात पुढील काही दिवस हवामान खात्याकडून ‘या’ भागात पावसाचा इशारा
‘महाराष्ट्राने संयम सोडला तर…’; शिवसेनेचा आक्रमक इशारा