वॉशिंग्टन : मला युद्ध आवडत नाही. पण मी देशभक्त आहे, असं अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली आहे. अमेेरिकेतील एका कार्यक्रमात प्रियांकाला एका महिलेने प्रश्नांचा भडीमार केला. त्यावर प्रियांका तिला उत्तर देताना तिने हे वक्तव्य केलं आहे. तू संयुक्त राष्ट्राची सद्भावना दूत आहेस. तरीही पाकिस्तानविरोधातील अणुयुद्धाला तू प्रोत्साहन देत आहेस, असं अमेरिकेमध्ये पाकिस्तानी महिला प्रियांकाला म्हणाली. त्यावर तिने आपलं मत व्यक्त केलं आहे.
माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते, असंही प्रियांका चोप्रा म्हणाली. अमेरिकेतील कार्यक्रमात तिने महिलांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
माझे अनेक मित्र पाकिस्तानमधील आहेत. मी भारतीय आहे. मलाही युद्ध आवडत नाही. आपण इथं प्रेमासाठी जमलो आहोत. त्यामुळं तू ओरडू नकोस, असं म्हणत प्रियांकाने त्या महिलेची बोलती बंद केली.
प्रियांकाच्या या हजरजवाबीपणाने तिने दिलेल्या उत्तराचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तसेच काही पाकिस्तानी नागरीकांनी प्रियांकाला ट्रोलही केलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला केला. त्यावर प्रियांकाने 26 फेब्रुवारी रोजी ट्विट करून जवानांचं अभिनंदन केलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-काश्मीरला वाचवणं आपलं कर्तव्य आहे- दिग्विजय सिंह
-मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘या’ अभिनेत्रीने दुसऱ्या पतीविरोधात घेतली पोलिसात धाव
-भारताचा वेस्ट इंडीजवर 59 धावांनी विजय
-पूरात विखुरलेली घरं सावरण्यासाठी संभाजीराजे सरसावले; जाहीर केली 5 कोटींची मदत
-भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये कोणी आणलं???; मुफ्ती-ओमर अब्दुल्ला यांच्यात शाब्दिक चकमक