“जे बोलतो ते करतोच, येणाऱ्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळा काढून त्यावर…”

अहमदनगर | भाजप नेते तथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी देशभरात विकासपुरूष म्हणून ओळखले जातात. देशात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी नितीन गडकरींचं योगदान महत्त्वाचं आहे. विरोधी पक्षांकडून देखील नितीन गडकरींचं तोंडभरून कौतुक करण्यात येतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींवर स्तुतीसुमने उधळली होती. त्यातच आता अहमदनगरमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरींनी हायड्रोजन संदर्भात भाष्य केलं आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये नितीन गडकरी बोलत होते. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी जे करतो तेच बोलतो आणि बोलतो तेच करतो. येत्या काळाचा पाण्यामधून हायड्रोजन वेगळा काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

आजच्या काळामध्ये अशी स्थिती आहे की गहू स्वस्त तर ब्रेड महाग तसेच टॉमेटो स्वस्त तर सॉस महाग, अशी स्थिती आहे. ज्यावेळेस गरज होती तेव्हा ऊसापासून साखर तयार केली आहे. लोक ऊस लावत आहेत. त्यामध्ये नफा आहे, असंही ते म्हणाले.

आज आपल्या देशामध्ये साखर सरप्लस आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इतर पदार्थांकडे वळण्याची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. तसेच अहमदनगरमध्ये कार आणि बस इथेनॉलवर चालवा, असं आवाहन नितीन गडकरींनी केलं आहे.

माझा ट्रक्टर बायो सीएनजीवर आहे. आपला शेतकरी अन्नदाता आहे त्यासोबतच ऊर्जादाता बनला पाहिजे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. गेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये नितीन गडकरींनी मागच्या जन्मी जो पाप करतो तो या जन्मात साखर कारखान काढतो, असं म्हटलं होतं.

रस्ते बांधकामाचे काम करताना माती लागते. तलाव खोदले की, त्याची माती रस्त्यांच्या कामासाठी  वापरण्यात येते, असं नितीन गडकरींनी सांगितलं. तसेच अशा पद्धतीनेचं मी 36 तलाव बांधले आहेत. नितीन गडकरी फुकटात तलाव करण्यास तयार आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, नितीन गडकरींनी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर भाष्य केलेलं आहे. अग्निपथ योजना चांगली आहे. फक्त ती समजून घेतली पाहिजे. लोकांना या योजनेची जशी माहिती मिळेल तसा विरोध संपुष्टात येईल, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”

दहावीच्या निकालात मुलींची बाजी; 97.96 टक्के मुली उत्तीर्ण 

“राष्ट्रपती निवडणुकीसाठी मी काही डावपेच रचलेत, माझा अर्ज 100 टक्के जाणार”

“शरद पवारांशिवाय तगडा उमेदवार देशात उरलाय का?” 

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी!