मुंबई | कोरोना काळात ठाकरे सरकारच्या 18 मंत्र्यांच्या कोरोनावरील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करून सरकारी तिजोरीचा पैसा वापरल्याची माहिती समोर आली होती.
या सर्व प्रकरणात 1 कोटी 40 लाख रूपयांचा वापर केल्याची माहिती समोर आली होती. त्यात खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर 34 लाख 40 खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
त्यावर आता खुद्द राजेश टोपे यांनी समोर येत उत्तर दिलं आहे. माझं वैयक्तिक कुठलंही मेडिकल बिल नाही, माझी आई आजारी होती आणि तीच ते बिल आहे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
राहिला इतरांचा प्रश्न तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि त्यांचा अधिकार आहे. ही सुविधा आहे आणि त्यांनी ती सुविधा घेतली, आमचे मेडिकल इन्शुरन्स सुद्धा आहे, अशही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी कोरोना निर्बंधावर देखील भाष्य केलं आहे.
आपण दररोज 60 हजार कोरोना रुग्ण पाहिले आहेत, तिथे सध्या फक्त शंभर-दीडशे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे लगेच काही बंधने घालण्याचा किंवा कठोर निर्णय घेण्याचा विचार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी माईकवर टॅप करून सांगितलं होतं…”; जयंत पाटलांचा मोठा खुलासा
IPL 2022: चेन्नई-मुंबईमध्ये आज महा’मुकाबला’; रोहितची मुंबई आज भोपळा फोडणार का?
अरे भाई भाई भाई! हलगीच्या तालावर तरुणाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल
“राज ठाकरेंचे बोल आधी गुलूगुलू वाटायचे, आता खाजवायला होतंय”
लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण, भाजप आमदाराला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता