मुंबई| बेधडक, बिनधास्त अभिनय करणारी ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसेची नुकतीच ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत एन्ट्री झालेली पहायला मिळाली. नेहा नेहमीच आपल्याला सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळत असते. कोणत्या न कोणत्या गोष्टीवरुन ती चर्चेचा विषय बनत असते. नुकतच झालेल्या एका मुलखतीमुळे ती पून्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहे.
नेहाच्या नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान तिनं बोल्ड सीनविषयी भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये नेहाला बोल्ड सीन देण्याविषयी विचारण्यात आलं होतं, तेव्हा ती म्हणाली की, भविष्यात बोल्ड सीन देण्यास मला कोणतीही समस्या नाही. पण केवळ अशा चित्रपटांमध्ये ज्याची कथा लव्ह मेकिंग आणि किसिंग सीन भोवती फिरत असते. एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटायचे की, ना लव्ह मेकिंग सीन ना किसिंग सीन मी केवळ अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकेन.
पुढे ती म्हणाली की, चांगल्या चित्रपटांमुळे मला एक गोष्ट कळाली जर चित्रपटाचे निर्माते चांगले असतील आणि असे सीन ते योग्य पद्धतीने दाखवत असतील किंवा चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये किसिंग सीन आणि बोल्ड सीन देण्याची गरज आहे तर मी ते नक्की देईन असे नेहा म्हणाली.
दरम्यान, लोकप्रिय टीव्ही शो ‘भाभीजी घर पर है’ मध्ये नेहानं गोरी मेमची भूमिका साकारणाऱ्या सौम्या टंडनला रिप्लेस केलं आहे. या शोमुळे नेहा मागच्या काही काळापासून चर्चेत आहे. मागच्याच वर्षी नेहा पेंडसेनं उद्योगपती शार्दुल सिंह बयासशी लग्न केलं.
नेहा पेंडसंन ‘भाभीजी घर पर है’मध्ये येण्याआधी नेहानं बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय काही हिंदी मालिकांमध्येही ती दिसली होती. या व्यतिरिक्त बिग बॉस सीझन 12 मध्येही ती सहभागी झाली होती. पण बिग बॉसच्या घरातील तिचा प्रवास खूप लवकर संपला होता.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
“सोनाराने कान टोचले तर दुखत नाही, बरं झालं…
‘या’ अभिनेत्रीच्या “बिंदी आणि बिकनी” फोटोचा सोशल…
‘आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे’;…