“मला पुनर्जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचं नाहीये”

मुंबई | स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या आठवणींत जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पहायला मिळत आहे.

लता मंगेशकर यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ एका मुलाखतीचा आहे. या मुलाखतीमध्ये पुन्हा जन्म मिळाला तर लता मंगेशकर म्हणून आवडले का?, असा प्रश्न विचारण्यात आल्याचं पहायला मिळत आहे.

लता दीदी म्हणाल्या, मला आधी पण असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मी जे उत्तर दिलं होतं तेच देईन, मला पुनर्जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचं नाहीये. त्यांच्या या उत्तरानं सगळ्यांनाच हैराण करुन टाकलं.

लता मंगेशकर असल्याच्या ज्या अडचणी किंवा समस्या आहेत त्या तिलाच माहित आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

लतादिदींच्या अंत्यदर्शनासाठी सर्वच क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार आहेत. लतादीदी यांचं पार्थिव शिवाजी पार्क येथे पोहोचलं, शेकडो नागरिक अंत्ययात्रेसाठी शिवाजी पार्क परिसरात उपस्थित झाले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=yeWr_mAWzmc

महत्त्वाच्या बातम्या – 

  “उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार” 

  ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं! वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार

 बापासाठी चिमुकली ढसाढसा रडली; पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

 प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा भीषण अपघात, कार उद्ध्वस्त

 ना विराट ना माॅरिस, ‘हा’ ठरलाय IPL सामन्यातील सर्वात महागडा खेळाडू