मुंबई | चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफ. जॅकी श्रॉफ यांनी गेली अनेक दशके प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घातली आहे.
बॉलिवूड मधील भिडू म्हणून ओळखले जाणारे जॅकी श्रॉफ नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मधल्या काळात जॅकी श्रॉफ चित्रपटसृष्टीपासून बरेच लांब होते. मात्र, आता पुन्हा ते चित्रपट सृष्टीत कमबॅक करताना दिसत आहेत. सध्या ते त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत.
जॅकी श्रॉफ लवकरच ‘द इंटरव्यू नाईट ऑफ 26/11’ या चित्रपटात झळकणार आहेत. ते या चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारत आहेत. नुकतंच एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांचा एक किसिंग सीन आहे. या सीनवरुन मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तुमचा मुलगा स्टंटसाठी ओळखला जातो. मात्र, तुम्ही चित्रपटात किसिंग सीन देत आहात. हा सीन देताना तुम्हाला संकोच वाटला का? असा सवाल जॅकी श्रॉफ यांना करण्यात आला होता.
यावर उत्तर देताना ते म्हणाले की, हा सीन करताना मला अजिबात संकोच वाटला नाही. माझा मुलगा हिरो झाला म्हणून मी किसिंग सीन करायचे नाही का?, असा सवाल जॅकी श्रॉफ यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
तसेच माझा मुलगा तरुण झालाय हा विचार करुन मी वेगवेगळ्या भूमिका करणं सोडू शकत नाही. त्यानं इंडस्ट्रीमध्ये स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मला आता त्याचे वडिल म्हणून ओळखले जाते, ही गोष्टच निराळी आहे, असं देखील जॅकी श्रॉफ यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, जॅकी श्रॉफ यांचा ‘द इंटरव्यू नाईट ऑफ 26 /11’ हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
ती वॉश बेसिनमध्ये पाय धुवायला गेली अन् बदकन आदळली; पाहा व्हिडीओ
झूम मिटिंग सुरू असताना अचानक कॅमेरा सुरू झाला अन् शिक्षकाचं बेडवरील कृत्य सर्वांसमोर आलं
वरुण धवन ठाकरे सरकारवर संतापला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
मी खूपच रोमॅन्टिक आहे, मला 3-4 मुलांची तरी आई व्हायचंय – भूमी पेडणेकर
रणवीर आणि आलियाचा कीस करतानाचा ‘तो’ फोटो व्हायरल