प्रेस कॉन्फरन्समध्ये सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले, म्हणाले, ‘मारा मला मी…’

नवी दिल्ली | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केल्यानंतर आज सोमय्या यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी आमच्यावर केलेल्या आरोपांची खुशाल चौकशी करावी, असं प्रतिआव्हान दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे 19 बंगले असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार सोमय्या यांनी केला. ते दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी बंगल्यांचा टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असं काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असंही सोमय्या यावेळी म्हणाले. यावेळी सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतल्याचं पाहायला मिळालं.

संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. 19 बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

संजय राऊत यांनी कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोलावं असं सोमय्या यांनी म्हटलं. कोव्हिड सेंटरमधील भ्रष्टाचाराप्रकरणी अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कोव्हिड सेंटरमधील घोटाळ्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याच्यावर कारवाई होत नाही. सगळे पुरावे दिले तरी कारवाई होत नसल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत आम्हाला तुरुंगात डांबण्याची धमकी दिली आहे. माझ्यावर राग काढायचा होता तर नील सोमय्या यांच्यावर आरोप करण्याची आवश्यकता नव्हती, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“खुशाल चौकशी करा, मी मुलासह जेलमध्ये जाण्यास तयार, पण… “ 

काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू

“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय” 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा