महाराष्ट्र मुंबई

एसीबीच्या अहवालावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार, पाहा काय म्हणाले…

मुंबई : न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे, चौकशीला आपण याअगोदर सहकार्य केलं असून यापुढेही सहकार्य करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचा सहभाग असल्याच ‘एसीबी’ने नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्रात म्हटलं आहे. अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सिंचन घोटाळ्याचं प्रकरण सध्या नागपूर खंडपीठात सुरु असून याबद्दल माझ्या एखाद्या वक्तव्यामुळे या प्रकरणात कोणतीही बाधा येऊ नये यामुळ मी याबद्दल फार काही बोलणार नाही असं मत अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी सरकार आपलं काम करत असल्याचं दिसत असल्याचं म्हटलं आहे.