अजित पवारांची ‘ही’ स्टाईल मला भावते- रोहित पवार

मुंबई | राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आपल्या मतदारसंघातील काही प्रश्न घेऊन अजित पवारांची भेट घेतल्यावर रोहित पवारांनी ट्विट करत अजित पवारांची एक स्टाईल भावत असल्याचं सांगितलं आहे.

मतदारसंघातील आणि इतर प्रश्नांबाबत अजित पवारांना भेटलो. हे प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन अजित पवांरांनी दिलं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते. त्यानुसार या प्रश्नांवरही निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असंही पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर  केलेल्या टीकेनंतर प्रथमच रोहित पवारांची अजित पवरांसोबत भेट होती.

 

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या बेडरूमच्या दरवाज्याचा टाळा तोडणाऱ्याने सांगितलं त्यावेळचं खरं वास्तव; टाळा फोडला तेव्हा…

“शिवथाळीच्या यशानंतर ‘शिव दवाखाने येणार, डाॅक्टरांच्या ऐवजी कंपाउंडर असणार”

सुशांत मृत्युप्रकरणी आदित्य ठाकरेंचा संबंध काय?; रिया म्हणाली..

“राज्यात ‘या’ 20 आजारांवर मोफत उपचार, फी आकारल्यास ….”; गणपतीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अशोक चव्हाणांवर दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी