‘चुक केली पण…’, शिल्पाच्या पोस्टनं वेधलं अनेकांचं लक्ष

मुंबई | सध्या चर्चेत असलेलं अश्लील व्हिडीओ प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक झाल्यापासून अनेक धागेदोरे समोर आले आहेत. पतीच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आणि कुटुंबियांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आता शिल्पा पुन्हा एकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे.

नुकतंच शिल्पानंं एका पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. यामधून शिल्पानं सोफिआ लॉरेन यांची ओळ शेअर केली. यामध्ये लिहिले आहे की ‘केलेल्या चूकीची भरपाई आपल्याला आयुष्यभर करावी लागते,’ या पोस्टमधील आणखी एका ओळीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

‘मी चुका करणार. मी स्वत:ला माफ करणार आणि झालेल्या चुकांमधूनच शिकणार’, अशी ओळ या पोस्टच्या शेवटी आहे. सध्या शिल्पाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे.

तर शेवटी शिल्पानं ‘चूक केली पण ठीक आहे,’ असं स्टीकरही या पोस्टला टाकलं आहे. गेल्या 19 जुलैला मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला बेड्या घातल्या आणि तेव्हापासून तो तुरूंगात आहे. पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी काही दिवस अचानक गायब झाली होती. ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ या शोमधूनही काही दिवस तिने ब्रेक घेतला होता.

शिल्पानं नुकतंच सुपर डान्सर 4 च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. परंतु, मीडियापासून तिनं दूर राहणेच पसंत केले आहे. दरम्यान, सुपर डान्सर 4 च्या सेटवर परतण्यासाठी तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्याचे समोर येत आहे.

बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झाल्यापासून ते दोघेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. 

दरम्यान, सध्याचा काळ शिल्पासाठी अत्यंत कठीण आहे. त्यामुळे अनेकदा शिल्पा सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना दिसते.

shilpa

महत्वाच्या बातम्या –

अभिनेता अपारशक्ती खुराणाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!

…म्हणून सई ताम्हणकर मराठी चित्रपटांपासून दुरावली!

पवनदीपच्या खासगी गोष्टीचा अरुणीताकडून खुलासा, म्हणाली…

मी आता केक कापणार नाही तर…; बर्थडेवरून भडकलेल्या गर्लफ्रेंडने उचललं ‘हे’ पाऊल; व्हिडीओ व्हायरल

सेटवर राखीला चावला कुत्रा, राखी म्हणतेय मी देखील त्याला चावणार; पाहा व्हिडीओ