“…म्हणजे पुर्ण बारामती चुकली का?; भाजपचा असला म्हणून काय झालं”

मुंबई | काही दिवसांपुर्वी त्रिपुरा राज्यात झालेल्या कथित हिंसाचार प्रकरणी अमरावती, मालेगाव आणि नांदेड येथे मुस्लिम समुदायाकडून मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर भाजपकडून अमरावती येथे बंद पुकारण्यात आला होता. अमरावती हिंसाचारावरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत आहेत.

त्यातच आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे. अमरावती येथील दंगलीवरून सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत की, दंगे करणारे समजा भाजपचे आहेत, तुमच्याकडे माहिती असेल तर पोलीस महासंचालकांनी यांना ऑफिसमध्ये बोलावलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहेे.

भाजपचा असला म्हणून काय झालं, त्याला काय कवचं कुंडल आहे का? दंगलीत भाजपचा कोणी असेल तर त्यालाही ठेचून काढलं पाहिजे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

एखाद्या पक्षाचा व्यक्ती चुकला तर तो पक्ष चुकीचा का?, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच नथुराम गोडसे बारामतीचे होते म्हणजे पुर्ण बारामती चुकली का?, असाही सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केला आहे.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मराठा आरक्षणावरून काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत 47 वर्ष दोन महिने एक दिवस काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा मात्र तुम्ही आरक्षण दिलं नाही, असं म्हणत काँग्रेसवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण दिलं ते तुम्ही टिकवलं नाही, वरून आम्हाला दोष देतात ही कोणती वृत्ती आहे? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

तसेच अमरावती हिंसाचारावरून सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत की, पोलीस महासंचालकांसोबत बैठक घ्या आणि हे पिल्लू ठेचून काढा.

तुम्ही तर वाघ मारायचं आव्हान करतात मग ही उंदराची पिल्लं ठेचायला काय अडचण आहे,. तुमची शक्ती गेली की सरकारने लखवा मारला? असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

दरम्यान, अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी हा कट रचला होता, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

भाजप महाराष्ट्रातील हिंसाचाराला जबाबदार आहे. महाराष्ट्रात दंगल भडकावण्याचा डाव होता, असाही आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यावरून एक व्यक्ती चुकला म्हणजे पुर्ण पक्ष चुकीचा का?, असा सवाल सुधीर मुनगंटीवारांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भाजप की काॅंग्रेस! कोल्हापूरच्या आखाड्यात कोणाचा पैलवान जिंकणार?

 “गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणणं म्हणजे हा गेंड्याचाच अपमान”

“उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”

  ‘…तर होय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचा हात’; राऊतांच्या आरोपावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

  मुंबईकरांनो सावधान! आता ‘या’ गोष्टीने वाढवले टेंशन