पाकचा मोहम्मद इरफान म्हणतो, मी भारताच्या ‘या’ खेळाडूची कारकीर्द उद्ध्वस्त केली!

कराची : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मर्यादित षटकातील गंभीरची कारकिर्दी मी उद्ध्वस्त केली. मोहम्मद इरफान याआधी शेवटचा सामना 2016 मध्ये खेळला होता.

पाकिस्तानने इंग्लविरुद्ध सामना खेळला होता. यात इरफानने 5 षटकात 26 धावा देत 2 गडी बाद केले होते. यामध्ये त्याने इंग्लंडचे दोन्ही सलमीवीर जेसन रॉय आणि अ‌ॅलेक्स हेल्स यांना बाद केलं होतं.

2012 च्या भारत-पाक मालिकेवेळी गंभीर त्याच्याविरुद्ध खेळायला भीत होता. त्यानंतर गंभीरची कारकिर्द संपुष्टात आली. गंभीरने त्या मालिकेनंतर फक्त एक एकदिवसीय मालिका खेळली. त्यानंतर गंभीरला संघातून बाहेर बसावं लागलं, असं मोहम्मद इरफानने एका वाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

गंभीर माझ्या उंचीमुळे फलंदाजी करायला भीत होता. मला नेहमीचं वाटायचं की तो माझ्याशी डोळे भिडवण्यापासून लपत होता, असंही इरफानने सांगितलं आहे.

 पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद इरफानची उंची 7 फूट 1 इंच असून त्याने फक्त 4 कसोटी सामने खेळले आहेत. यात दहा गडी बाद केले आहेत. तर 60 एकदिवसीय सामन्यात 83 गडी बाद केले आहेत. याशिवाय 20 टी20 सामन्यात 15 गडी बाद केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-