“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”

मुंबई | भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी एका चर्चेदरम्यान इस्लामचे संस्थापक प्रेषित महंमद यांच्याबद्दल कथित अपमानजनक टिप्पणी केली होती. यानंतर देशातील वातावरण ढवळून निघालं होतं.

मुस्लिम समुदायांनी जोरदार आक्षेप घेऊन निषेध केला; तसेच काही देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे ट्विटर ट्रेंडही पुढे आले. या सगळ्या घडामोडींनंतर आता अरबमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सातत्यानं निर्माण केलं जाणारं विखारी वातावरण आणि एकप्रकारची वाचाळता यामुळे जागतिक पातळीवर काय नुकसान होऊ शकतं, देशाची मान कशा पद्धतीनं खाली झुकली जाते, याचा प्रत्यय गेल्या काही दिवसात आपल्याला येतोय, हे घडत असताना माध्यमातून ज्या बातम्या समोर येत आहेत, ज्या पद्धीतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा निषेध हा काही देशांमध्ये केला जातोय, ते नक्कीच खेदजनक आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.

पंतप्रधान हे केवळ व्यक्ती नसून ती एक इंन्स्टीट्यूशन आहे. या इन्स्टीट्यूशनचा मान राखला गेला पाहिजे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने पंतप्रधान पदाचा अभिमान हा बाळगळाच पाहिजे. माझ्या देशाच्या पंतप्रधानांचा कुणी अवमान करत असेल, तर या देशाचा नागरिक, लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

“पंकजा मुंडे यांच्या नावासाठी फडणवीसांनी आणि मी खूप प्रयत्न केले पण…” 

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना आता रिझर्व्ह बँकेचा मोठा झटका! 

‘आघाडीचं मतांचं गणित बिघडलं?’; राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर 

मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे सुरू झालेल्या वादात कंगणाची उडी, म्हणाली… 

महिन्याला 1000 रूपयांची गुंतवणूक करून 2 कोटी जमवा, जाणून घ्या भन्नाट योजना