“मी माईकवर टॅप करून सांगितलं होतं…”; जयंत पाटलांचा मोठा खुलासा

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी इस्लामपूरमध्ये झालेल्या सभेत केलेल्या वक्तव्यावरून सध्या बराच वाद सुरू झाला आहे. मिटकरींना या सभेत लग्नातील एक किस्सा सांगितला होता. त्यामुळे मोठा वाद उद्भवला आहे.

मम भार्या समर्पयामी या वाक्याचा अर्थ मिटकरींनी यावेळी समजून सांगितला होता. त्यामुळे ब्राह्मण समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात मिटकरींविरूद्ध आंदोलन देखील करण्यात आलं.

मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे. त्यावर आता माफी मागणार नसल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

लग्नविधीदरम्यानच्या मंत्राचा उल्लेख मिटकरींनी केला. त्यानंतर मी देखील माईकवर टॅप करून त्यांना भाषण थांबवण्याची सूचना केली. ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा हेतू सभेचा नव्हता. त्यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटतोय, असं म्हणत जयंत पाटलांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, आमची तशी भावना नाही. त्यामुळे ब्राम्हण समाजाने गैरसमज करून घेऊ नये, अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

IPL 2022: चेन्नई-मुंबईमध्ये आज महा’मुकाबला’; रोहितची मुंबई आज भोपळा फोडणार का?

अरे भाई भाई भाई! हलगीच्या तालावर तरुणाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

“राज ठाकरेंचे बोल आधी गुलूगुलू वाटायचे, आता खाजवायला होतंय”

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण, भाजप आमदाराला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Maruti Suzuki XL6 Facelift: हायटेक फिचर्ससह भारतीयांची आवडती कार लाँच; किंमत पण फारच कमी