मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर गुडीपाडव्या मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती.
राज ठाकरे यांच्या भाषणामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.
अशातच आता शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यावेळी त्यांनी मनसे ही भाजपची सी टीम असल्याची टीका देखील केली आहे.
मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळतंय, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.
एमआयएम ही भाजपची बी आणि मनसे ही भाजपची सी टीम असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली आहे. भाजपचं राजकारण हे राज्यात सत्ता मिळवण्यासाठी असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेला मत दिलं जातं. उद्धव ठाकरे आणि आमचं काम पालिका निवडणुकीतील चेहरा असतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Gold Silver Rate: सोने-चांदी दरात मोठी घसरण, वाचा काय आहे आजचा भाव
मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाचा झटका
चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, अत्यंत धक्कादायक बातमी समोर
“कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू”
सर्वात मोठी बातमी! HDFC ने केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा