कानपूर | मला तर देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. ते शुक्रवारी कानपूर देहात जिल्ह्यातील राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचं मुळ गाव असलेल्या परौंख येथे बोलत होते.
मी कुणाच्याही विरोधात नाही, माझे कुणाशीही वैयक्तीक मतभेद नाहीत. पण लोकशाही बळकट करण्यासाठी घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांनी यातून बाहेर पडायला हवं, असं नरेंद्र मोदी म्हणालेत.
देश आणि लोकशाहीप्रती समर्पित असलेल्या पक्षांमध्ये आपल्याला एक मजबूत विरोधी पक्ष हवा आहे, असं नेरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचंही स्वागत केलं.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात कानपूर देहातवर आधारित कॉफी टेबल बुकचं प्रकाशन केलं. या कार्यक्रमात राष्ट्रपती आणि परौंख गावावर आधारित एक डॉक्युमेंट्रीही दाखवण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या-
’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती!
“मी जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल”
करूणा शर्मांचा मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप, म्हणाल्या…
व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!