मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सी.बी.आय.कडं सोपविल्यानंतर सी.बी.आय.नं 13 दिवसाच्या तपासानंतर सुशांतनं आ.त्मह.त्या केल्याचं स्पष्ट केलं आहे. सी.बी.आय सध्या सुशांतच्या आ.त्मह.त्येच्या बाजूनं तपास करत आहे. सुशांतच्या मृ.त्यूनं सुशांतच्या कुटुंबासह अनेकांना धक्का बसला आहे. सुशांतची ए.क्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेलाही सुशांतच्या मृ.त्यूचा जबर धक्का बसला आहे.
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे दोघेजण झी वाहिनीवरील ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेमध्ये एकत्र काम करत होते. या मालिकेत काम करत असतानाच सुशांत आणि अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर हे दोघेजण बरीच वर्ष एकत्र राहत होते. मात्र, काही कारणानं त्यांच्यात वा.द झाला आणि हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले होते. अंकिता सोशल मिडियावर नेहमीच सक्रीय असते. अंकितानं आता इंस्टाग्रामवर तिच्या आईसोबत एक सुंदर फोटो शेअर करत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
माझी सर्वप्रथम आणि कायमच आवडती शिक्षिका. तुला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई . मी माझ्या मुलांसाठी नेहमी तुझ्यासारखं होण्याचा प्रयत्न करेन. लव्ह यु आई, अशी पोस्ट अंकिता लोखंडेनं इंस्टाग्रामवर केली आहे.
अंकितानं शिक्षक दिनानिम्मित आईसाठी ही खास पोस्ट शेअर केली आहे. अंकिता सोशल मिडियावर आपले कुटुंबीय तसेच मित्र-मैत्रिणींसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. अंकिताच्या पोस्टला तिचे चाहते नेहमीच भरभरून प्रेम देत असतात. अंकिताच्या याही पोस्टला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलं आहे.
दरम्यान, सुशांतच्या मृ.त्यु.नंतर अंकितानं सुशांत प्रकरणात सी.बी.आयनं तपास करावा, अशी मागणी केली होती. तसेच रिया आणि सुशांतच्या नात्याबद्दल माझा काहीही आक्षेप नाही. मात्र, रियाविरुद्ध सुशांतच्या परिवाराकडे पुरावे असल्यानं मी नेहमीच त्यांच्या बाजूनं असेल, असं अंकितानं म्हटलं होतं.
सध्या अंकिताची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये अंकिताला तू सुशांतला शेवटी काय संदेश देऊ इच्छिते?, असं विचारलं जात आहे. यावर अंकिता म्हणते, मी बस्स एवढंच सांगू इच्छिते सुशांत तुझ्यावर प्रेम करणारे खूप जण आहेत. तुझ्यासाठी संपूर्ण देश उभा राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
या एका रोपट्यामुळे होऊ शकतो कोरोनाचा नायनाट; भारतीय तज्ज्ञांचा दावा
अभिनेता अर्जुन कपूरनंतर आता त्याच्या ‘या’ गर्लफ्रेंडलाही कोरोनाची लागण
सुशांत प्रकरणी डाव फिरला! ‘या’ व्यक्तीनंही दिला रिया विरुद्ध जबाब म्हणाला…
सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रिया चक्रवर्ती स्वतः अ.टकेसाठी तयार