मुंबई | राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे. त्यामुळे सध्या राजकीय गदारोळ पहायला मिळत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे.
मला उद्धव ठाकरे यांची कुंडली पहायची आहे, काय भाग्यवान माणूस आहे. कशाचं सोयर सुतक नाही, काही काम नाही, पण त्यांना कुणी हलवू शकत नाही, असा तिखट टोला पाटलांनी लगावला आहे.
सगळे आमदार काम घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात. उद्या सामनामधून माझी खिल्ली उडवली जाईल. पण काळ तुम्हाला दाखवून देतील तुम्ही कुणाची खिल्ली उडवता, असंही पाटलांनी म्हटलं.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडून माझी सारखी चेष्टा केली जाते पण ही चेष्टा त्यांच्या अंगावर येणार आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या सलग होणाऱ्या कारवाईमुळे राज्य सरकारमधील मंत्री त्रासले आहेत. खास करुन आघाडी सरकारमधील मंत्र्यावर होणाऱ्या कारवाईमुळे.
राज्यातील राजकीय वातावरण सध्या बिघडलं असून दिवसेंदिवस काही ना काही खडांजंगी पहायला मिळत असते.
महत्त्वाच्या बातम्या –
“दादा राज्य तुम्ही चालवता, मुख्यमंत्री कधी कधी दिसतात”
“राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत”
“काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय”
“तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेत, नाहीतर ते काय देणार घंटा”
‘धोनीमुळे मी…’; विजयानंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा