माकडासोबत फोटो काढायला गेला अन् घडला भयानक प्रकार; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | अनेक धार्मिक स्थळी किंवा वन्य ठिकाणी आपल्याला माकडे पाहायला मिळतात. ही माकडे पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरतात. अनेकांना माकडांसोबत फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. परंतु बहुतेकदा हा मोह चांगलाच अंगलट येतो.

माकडासोबत फोटो काढणं चांगलंच अंगलट आलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण माकडासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु या तरुणाचा प्रयत्न फसतो आणि माकड त्याच्यावर हल्ला चढवते.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक माकड पायऱ्यांचा बाजूला शांत बसलं आहे. ते माकड येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींकडे पाहत आहे. माकड शांत बसलेलं पाहून एक तरुण फोटो काढण्यासाठी त्याच्याजवळ जावून पोझ देतो.

माकड तरी देखील शांत बसलेलं असतं. त्याचं या तरुणाकडे लक्ष नसतं. तितक्यात कोणीतरी एक व्यक्ती फोटो काढणाऱ्या तरुणाच्या पाठीमागून येतो आणि माकडाच्या पाठीवरून हात फिरवतो. कोणीतरी स्पर्श केल्याची जाणीव होताच माकड रागाने पाठीमागे वळून पाहते.

ज्या व्यक्तीने या माकडाला स्पर्श केलेला असतो तो तिथून निघून जातो. परंतु फोटो काढण्यासाठी पोझ देऊन उभा राहिलेला तरुण त्या माकडाकडे पाहतो. तरुणाने माकडाकडे पाहताच क्षणी माकड त्याच्यावर हल्ला चढवते.

माकड या तरुणाच्या हाताला पकडते आणि त्याचा जोरात चावा घेते. या तरुणानेच आपल्या पाठीवर हाथ फिरवला असल्याचा गैरसमज या माकडाला झाला असावा यामुळे त्याने तरुणावर हल्ला चढवला.

दरम्यान, videolucu.funny या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तरुणाचा चावा घेणाऱ्या या माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून करीना-दीपिका नव्हे तर कंगना करतेय ‘द इनकारनेशन सीता’मध्ये मुख्य भूमिका

‘…अन् रात्री झोपताना कोणीतरी माझा गळा दाबायचं’; हेमा मालिनींनी सांगितला भयाण किस्सा!

‘करिश्माने माझ्याशी फक्त पैशासाठी लग्न केलं’; पतीच्या गंभीर आरोपानंतर करिश्माने…

भर कार्यक्रमात मिका सिंगने राखीसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा!

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे दर