‘पुढील पाच वर्षात देणार एक लाख लोकांना नोकऱ्या,’ ‘या’ अभिनेत्यानं केली मोठी घोषणा

कोरोना व्हायरसच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनच्या काळात गरजूसांठी मसिहा बनलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. सोनू सूद खऱ्या आयुष्यात देखील नायक असल्याचे त्याने लॉकडाऊनमध्ये सिद्ध केले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आजही तो गरजूसांठी मदतीचा हात सरसावताना दिसतो. त्यामुळे तो नेहमी कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असतो. यातच आता तो आणखी एका नवीन गोष्टीसाठी चर्चेत आला आहे.

आता अभिनेता सोनू सूद त्याच्या एका गोष्टीमुळे 10 करोड लोकांचे आयुष्य बदलणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोनूनं याविषयी माहिती दिली आहे. सोनूने नुकतेच ट्विटरद्वारे त्याचा एक महत्त्वकांक्षी प्लान लोकांसोबत शेअर केला आहे. त्यामुळे त्याच्यावर पून्हा एकदा कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.

सोशल मी़डियावर पोस्ट शेअर करत सोनूनं लिहिलं की, ‘नवे वर्ष, नव्या आकांक्षा आणि नवी उमेद. आता एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था केली आहे. 5 वर्षात सुमारे 10 कोटी लोकांचे जीवन बदलण्याचा विचार आहे. आजच गुडवर्कर अ‍ॅप डाऊनलोड करा आणि उद्याचे भविष्य सुरक्षित करा’,

सोनूने या अ‍ॅप्लिकेशनला डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक दिली आहे. या अ‍ॅपद्वारे 10 करोड लोकांचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नोकरी शोधणारे युवक सोनूचे हे ट्वीट पाहून प्रचंड आनंदी झाले आहेत.

दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूचा उद्भाव झाल्यानंतर, देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय कामगारांसाठी बॉलीवूड अभिनेता सोनू सूद देवदूत ठरला होता. सोनू सूदने अशाप्रकारे एखाद्याची मदत करून एखाद्याचा जीव वाचवण्याची पहिलीच वेळ नाही. सोनूने अनके विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत अनेकांना मदत केली आहे. देशभरातील अनेक लोकं सोनूकडे त्यांच्या समस्या मांडतात आणि सोनूही त्यांना सढळ हाताना मदत करतो.

भारतात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशाच्या विविध भागात राहाणारे मजूर आपल्या घरात परतण्याचा प्रयत्न करू लागले होते. रेल्वे, बस यांसारखी सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेकांना चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा मजुरांना सोनू सुदने स्वतः खर्च करत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले. त्यामुळे चित्रपटांमध्ये खलनायकाचे काम करणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात नायक बनला.

 

महत्वाच्या बातम्या –

‘महाराष्ट्राने संयम सोडला तर…’; शिवसेनेचा आक्रमक इशारा

करिअरच्या उंच शिखरावर असताना ‘या’ कारणामुळे झाला होता इंडस्ट्रीतून गायब, जाणून घ्या हनी सिंगच्या खडतर प्रवासाबद्दल

‘या’ भाजप नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

जाणून घ्या! तांदळाच्या पाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

व्हायचं होतं पत्रकार झाला अभिनेता, वाचा ‘या’ अभिनेत्याचा किस्सा