मुंबई | गुगलला राजकारणी म्हणजेच पाॅलिटीशियन म्हणून सर्च केलं तर, ढेरी वाढलेला पांढऱ्या कपड्यातील वेक्टर फोटो समोर येतो. राजकारणी म्हणजे त्याप्रकारची एक ओळख मागील अनेक वर्षापासून निर्माण झाली आहे.
राजकारणी असो, खेळाडू असो किंवा सामान्य व्यक्ती… आरोग्य ही सर्वात मोलाची वस्तू असते. त्यामुळे आताच्या धावपळीच्या जीवनात फिटनेस चांगली ठेवणं गरजेचं असतं.
अशातच शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. स्वत: अमोल कोल्हे यांनी याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यह टायर तो फायर निकला…, लेकिन मैं थकेगा नहीं साला, असा पुष्पाचा डायलाॅग अमोल कोल्हे यांनी मारला आहे. अमोल कोल्हे या व्हिडीओमध्ये जीममध्ये घाम गाळताना दिसत आहेत.
लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल, असं म्हणत त्यांनी मार्मिक टिपण्णी देखील केलीये.
दरम्यान, अमोल कोल्हेंचा हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आवडल्याचं पहायला मिळतंय. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत कोल्हेंना प्रोत्साहित देखील केलंय.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
सलमान खानला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: भाईजानने केला धक्कादायक खुलासा
The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”
अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“वाकणार नाही, मोडणारही नाही, आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही”
“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच”