“मी माझ्या पोरीला महाराष्ट्रात ठेवणार नाही”, ईडीच्या कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांनी गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. अशातच आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

पाटणकर यांच्या कंपनीची तब्बल 6 कोटी 45 लाख रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या कार्यालयाकडून कारवाई केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर करण्यात आलेल्या या ईडीच्या कारवाईनंतर आता राजकीय वर्तुळात वादंग पहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, यावर आता वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल, असे संकेत आव्हाडांनी यावेळी दिले आहेत.

माझं मत विचाराल तर माझ्या मुलीला मी महाराष्ट्रात ठेवणार नाही, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले आहेत. आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

राज्याने कुणावर कधी अशी सूडबुद्धीन कारवाई केली नाही. कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे, असंही आव्हाड यावेळी म्हणाले आहेत.

तुम्ही आम्हाला जेवढं डिवचाल तेवढं आम्ही जास्त जवळ येऊ, तुम्ही डिवचाल म्हणून आम्ही कोसळू असं होणार नाही, असा थेट इशारा देखील त्यांनी यावेळी भाजपला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Narayan Rane: “आगे आगे देखिए होता है क्‍या!”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा”

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मेव्हण्याची संपत्ती ईडीकडून जप्त

सलमान खानला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: भाईजानने केला धक्कादायक खुलासा

 The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”