पुणे | राज्यात अनेक घडामोडी घडत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेते यांच्यामध्ये चांगलीच आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली असल्याचं पाहायला मिळतं आहे.
अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या या अटकेनंतर राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडीली आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांकडून या घटनेवर प्रतिक्रियाही यायला सुरूवात झाली आहे.
अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ईडी कायद्याप्रमाणे चौकशी करत आहे. चौकशीनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय ईडीने घेतला आहे. त्यामुळे चुकीला माफी नसल्याचंही पाटलांनी म्हटलं आहे.
आज सकाळी चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना अनिल देशमुख यांच्या अटकेबद्दल विचारले असता, त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी त्यांना किरीट सोमय्या सध्या एक-एक नेत्याविरोधात पुरावे सादर करणार असल्याचं बोलत आहेत. त्याविषयी तुम्ही काय सांगसाल असा सवाल केला असता. जेव्हा पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. तेव्हापासून आणि आताही ‘चल जायेगा’ असं चालणार नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
अनिल देशमुख काल मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली असल्याचं समजतं आहे. त्याअगोदर त्यांची जवळजवळ 13 तास चौकशी करण्यात आली होती. परंतू त्या चौकशीदरम्यान देशमुख यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केलं नसल्याची माहिती समोर येतं आहे.
त्यामुळे सेक्शन 19 पीएमएलए च्या अंतर्गत अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. तसेच राज्यात याही व्यतिरीक्त अनेक घडामोडी घडत आहे.
बॉलिवूड अभिनेता आणि किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये ड्रग्स प्रकरणी अटक केल्यापासून राज्यात दिवाळीचे अनेक फटाके फुटत आहेत. शुक्रवारी आर्यन खानला जामिन मिळाला आहे. परंतू त्यावेळी अनेक भुरट्या चोरांनी आपला हात साफ करून घेतला असल्याचं कानावर आलं होतं.
तर दुसरीकडे याच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ईडीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अनेक गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण खूप गढूळ झालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“…तर मी फोटोग्राफी केली असती आणि फडणवीसांना प्रदर्शनाला बोलावलं असतं”
पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्राला लुटलं आहे- किरीट सोमय्या
मी सरळमार्गाने आणि नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती- अनिल देशमुख
नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
“देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन हा ड्रग्जचा खेळ सुरु आहे”