‘मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो’ मृत्यूपूर्वी अभिनेत्याची धक्कादायक पोस्ट

मुंबई| कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर परिणाम होत आहे.

अशातच अभिनेता राहुल वोहरा याचे करोनाने निधन झाले आहे. थिएटर दिग्दर्शक आणि लेखक अरविंद गौहर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याच्या निधनाची बातमी दिली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यापासून राहुल वोहराची तब्येत सातत्याने खराब होत होती. राहुल मरण्याअगोदर फेसबुकवरून पोस्ट करत चांगल्या उपचारासाठी त्याने विनंती केली होती. राहुलची ती पोस्ट वाचून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो. तुमचा राहुल वोहरा. त्यापुढे म्हटलंय की, लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन आता हिंमत हरलो असल्याचं राहुलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राहुलने कोरोनाशी लढताना ही मदतीची मागणी करणारी पोस्ट केली होती.

अरविंद गौहर यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत राहुलच्या निधनाची बातमी दिली. “राहुल वोहरा चालला गेला. माझा एक उत्तम अभिनेता. काल संध्याकाळी त्यांना राजीव गांधी रुग्णालयातून आयुष्मान, द्वारका येथे हलविण्यात आले होते..पण राहुल आम्ही सर्व तुला वाचवू शकलो नाही, आम्ही माफी मागतो आम्ही तुझे गुन्हेगार आहोत…शेवटचा सलाम”, अशी पोस्ट अरविंद यांनी केली.

उत्तराखंडचा राहुल हा डिजिटल व्यासपीठावर लोकप्रिय चेहरा होता. नेटफ्लिक्स मालिका फ्रीडममध्ये तो दिसला होता. राहुलचे काम सगळ्यांनाच खूप आवडले आणि चाहत्यांनी त्याचं कौतुक केले.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत.

rahul vohra

arvind gaur

महत्वाच्या बातम्या – 

‘तुझ्या स्वभावातील कटुतेचीही टेस्ट करून घे’…

लपून-छपून लग्नखरेदी; पोलीसांनी दुकानाचं शटर उघडताच तरुणाला…

कोरोनाचे नियम मोडून पोलीसांशीच वाद घालू लागली तरूणी, पाहा…

इन्स्टाग्रामनं डिलीट केली ‘ती’ वादग्रस्त पोस्ट,…

‘सगळे पुरूष एकसारखेचं असतात?’ म्हणत मीरा…