मुंबई | आयएएनएस आणि सी व्होटर्सने देशभारातील वेगवेगळ्या राज्यांमधील जनतेकडून राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. ज्यामाध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यांमधले असल्याचं समोर आलं आहे.
सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यांमधील आहे. तळाला असणाऱ्या पाच मुख्यमंत्र्यांपैकी एका राज्यातील सरकारक हे भाजपाच्या पाठिंब्यामुळे स्थापन झालेलं आहे. सर्वात कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये हरणायाचे मनोहर लाल खट्टर (४.४७ टक्के मते), उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (१७.७२) आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (४२.७९) या तीन भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
तळाच्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (३०.८२) आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (२७.५१) यांचा समावेश आहे.
या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हिंदुस्थान युनिलिव्हरकडून सरकारला मोठी मदत; उद्धव म्हणाले, तुमची मदत कधीच विसरणार नाही!
-निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळलं, महाराष्ट्रावर विठू-माऊली आणि मुंबादेवीची कृपा- मुख्यमंत्री
-राज्यात आज 2560 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?
-लडाखमध्ये तुमचा हस्तक्षेप नको, आमचं आम्ही बघू; चीनचं अमेरिकला उत्तर
-देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पंधरा दिवसांत एक लाखावरून दोन लाखांवर