देश

ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा

चंदिगढ | सरकारी कर्तव्य बजावताना असुरक्षित वाटत असल्याचं कारण देत 2014 च्या हरयाणा केडरच्या आयएएस अधिकारी राणी नागर यांनी राजीनामा दिला आहे. राणी नागर सध्या आर्काइव्ह्स विभागाच्या संचालिका म्हणून काम करत होत्या.

राणी यांनी वैयक्तिक सुरक्षेचं कारण देत राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसनं राज्य सरकारला लक्ष्य केलं. राणी यांचा राजीनामा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं अपयश नाही का, असा सवाल काँग्रेसनं विचारला आहे.

राणी नागर यांनी काल त्यांचा राजीनामा राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवला. माझा राजीनामा केंद्र सरकारमधील योग्य विभागाकडे पाठवण्यात यावा, अशी विनंतीदेखील त्यांनी केली. राजीनाम्याची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, हरयाणाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठवणार असल्याचं राणी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सरकारी कर्तव्यावर असताना सुरक्षित वाटत नसल्यानं राजीनामा देत आहे, असं राणी यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अंबानी कुटुंबाने खूप मदत केली, त्यांच्या मदतीशिवाय हा प्रवास पूर्ण झाला नसता- नीतू कपूर

-“इस्रायल कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”

-“नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भक्तांकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का?”

-‘तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…’; ठाकरे सरकारचं आवाहन

-‘या’ राज्यात दारूवर 70 टक्के कोरोना फी; सरकारच्या निर्णयाने तळीरामांची पंचायत