Top news देश

IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले

Raid

नवी दिल्ली | झारखंडमधील वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी सचिव पूजा सिंघल यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.

पूजा सिंघल यांचे पती आणि व्यावसायिक अभिषेक झा यांच्या चार्टर्ड अकाउंटंटकडून तब्बल 19 कोटी 31 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी सहा वाजता ईडीच्या पथकाने पाच राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात केली.

रांची, मुझफ्फरपूर, कोलकाता, दिल्ली आणि जयपूर येथे हे छापे टाकण्यात आलेत. ही रक्कम कशी आली याची माहिती ईडी गोळा करत आहे.

ईडीने अद्याप यासंदर्भात अधिकृत दुजोरा दिलेला नाही. शुक्रवारी पहाटे सुरू झालेली ईडीची ही कारवाई अद्यापही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

पूजा सिंघल यांचे भाऊ आणि पालकांचे निवासस्थान, सीएचे एंट्री ऑपरेटर रौनक आणि प्राची अग्रवाल यांचे कोलकाता येथील निवासस्थान, राजस्थानचे माजी सहाय्यक अभियंता राजेंद्र कुमार जैन यांचे जयपूरमधील एकूण निवासस्थान इथेही छापा टाकण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला अटक होण्याची शक्यता

“मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण…” 

सपना चौधरीच्या ‘या’ गाण्यावर तरुणाई फिदा, 32 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडीओ 

“खासगीकरणाची खाज वाढायला लागलीय, कुठे-कुठे खाजवणार?” 

 “महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणाऱ्या काळात निवडणुका एकत्र लढणार”