5 अनाथ मुलांना मराठमोळे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी दिला मदतीचा हात

रांची |  आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या 5 अनाथ मुलांना मायेचा मदतीचा हात देऊन त्यांना परत माणसात आणण्याचं काम केलंय मराठमोळे बार्शीचे सुपुत्र आणि रांची कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी…! कोडरमा शहरातील छोटगी बागी वार्डमधील गरीब कुटुंबातील अनाथ मुलांच्या डोक्यावर घोलप यांनी हात ठेवला आहे.

आई वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या 5 मुलांची भेट घेऊन तीन मुलांचा त्यांनी शाळेत दाखला घेतला. अगोदर वडिलांनी या जगाचा निरोप घेतला होता. नंतर आईचंही निधन झाल्याने मुलांना भविष्याची मोठी चिंता लागली होती. मात्र माणुसकीबाज घोलप यांनी अनाथ मुलांना मदतीचा हात दिला आहे.

माझी संवेदना आणि माझे आशीर्वाद या मुलांच्या सोबत आहेत. मुलांच्या भविष्यासंदर्भात सरकारच्या विविध योजनांतून त्यांना कश्या प्रकारे जास्तीत जास्त मदत होईल, अशा प्रकारचे प्रयत्न मी नक्कीच करेन कारण माझं बालपण देखील याच हाल-अपेष्टांतून गेलेलं आहे, अशी भावनिक तितकीच कणखर प्रतिक्रिया रमेश घोलप यांनी दिला आहे.

रमेश घोलप यांची झारखंड राज्यातील त्यांच्या कार्यक्षेत्रात पेन्शनवाला साहेब म्हणून ओळख आहे. त्यांच्या प्रामाणिक कामाने त्यांनी जनतेच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. 5 अनाथ मुलांना मायेचा हात दिल्यानंतर घोलप यांची सर्वच क्षेत्रातून वाहवा होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आनंदाची बातमी… कोरोनाला आपण हरवणारच, राजेश टोपेंची महाराष्ट्राला मोठी गूडन्यूज!

-अत्यावश्यक सेवेसाठी केंद्राने मुंबईत लोकल सुरू करावी; आव्हाडांची मागणी

-माणुसकी मेली, गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर फुटले अश्रूंचे बांध…!

-रायगडला ‘निसर्ग’चा मोठा फटका; पालकमंत्री आदिती तटकरेंची मुख्यमंत्र्यांकडे ही महत्त्वाची मागणी

-रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याच्या तक्रारी, खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांच्या अचानक भेटी