नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन नावाचा नवा कोरोना विषाणू आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या या नव्या रुपामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा तसेच केंद्र सरकार अलर्ट झालं आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत भारतीय वैद्यकीय संशोधक संस्थेने महत्वाची माहिती दिली आहे. तसेच कोरोनाचा दुसरा डोस घ्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
ओमिक्रॉन’मध्ये होत असलेले रचनात्मक बदल काळजी वाढवण्याची शक्यता कमी आहे. हा नवा विषाणू घातक किंवा अनेक आजार निर्माण करणारा ठरेल असं गरजेचं नाही. अशी कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नसून आपल्याला वाट पहावी लागेल, असं आयसीएमआरचे डॉक्टर समीरन पांडा यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराला शास्त्रीय भाषेत B.1.1529 या नावाने ओळखले जात होते. नंतर WHO ने त्याला ‘Omicron’ असं नाव दिलं गेलं.
WHO ने सांगितले की ज्या पहिल्या नमुन्यातून ओमिक्रॉनची पहिली केस आढळली होती, त्याची चाचणी 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती.
ओमिक्रॉन या विषाणूनची लागण झालेले रुग्ण आता बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि दक्षिण आफ्रिकेत आढळत आहेत.
या नव्या व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक घेतली.
या बैठकीत कोरोनासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच कोणती काळजी घ्यावी, काय खबरदारी घेण्यात यावी यावर या बैठकीत चर्चा झाली. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे.
या पत्रात राज्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवावं, असं सूचित करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“उद्धव ठाकरे गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले”
‘या’ पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दीड वर्षात 1 लाखाचे झाले ‘इतके’ कोटी
छगन भुजबळांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली, म्हणाले…
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं उडवली सरकारची झोप; महाराष्ट्रात नवे निर्बंध लागू
खळबळजनक बातमी समोर; एकाच कॉलेजमधील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण लाग