मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती 11’ मध्ये अमरावतीच्या बबिता ताडे यांनी कोट्यधीश होण्याचा मान मिळवला आहे. परंतु बबिता ताडे खरोखरच कोट्यधीश झाल्या आहेत का? त्यांच्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा झाली आहे, हा प्रश्न चाहत्यांना पडला असल्याचं समजतंय.
ताडे यांनी जिंकलेल्या एक कोटी रुपयांवर 33 टक्के टॅक्स लागेल. त्यामुळे जवळपास 67 लाख रुपये बबिता ताडेंच्या बँक खात्यात जमा होतील. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांनी ही रक्कम अकाऊंटमध्ये जमा होणार असल्याचं कळतंय.
केबीसीमध्ये कितीही रक्कम जिंकली तरी 33 टक्के कर सरकारकडे जमा करावाच लागतो. म्हणजे एक कोटी रुपये जिंकल्यावर 33 लाखांचा कर भरावा लागतो, तर दहा हजार जिंकल्यावरही 3 हजार 300 रुपये टॅक्स भरुन केवळ 6 हजार 700 रुपयांवर समाधान मानावं लागतं.
बबिता यांनी एक एक टप्पा पार करत एक कोटी रुपये जिंकले. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर बबिता ताडेंना सात कोटींचा प्रश्नही विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी खेळ तिथेच थांबवण्याचा निर्णय घेत एक कोटी रुपयांमध्ये समाधान मानलं आहे.
दरम्यान, एक कोटी रुपये जिंकल्यावर काय करणार, असा प्रश्न जेव्हा बिग बींनी विचारला, तेव्हा बबिता ताडेंनी अगदी भाबडेपणाने मोबाईल फोन घेईन, असं उत्तर दिलं. घरात एकच मोबाईल असून तो सर्व जण वापरतात. त्यामुळे आपल्याला वैयक्तिक मोबाईल असावा, असं बबिती यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
युतीवर काळे ढग दिसताच सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा समाचार! https://t.co/k3DokSuJ1p @Shivsena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
‘या’ कारणामुळे निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेल दरात वाढ! – https://t.co/TVM6vCiQE0 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
दगाबाजी करू नका नाहीतर….; चंद्रकांत खैरेंचा भाजपला इशाराhttps://t.co/U3tF9IwZHl @ChandrakantKMP @ShivsenaComms @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019