“मागच्या जन्मात पाप केलेला माणूस साखर कारखाना काढतो नाहीतर…”

नवी दिल्ली | केंद्र सरकारनं नुकतंच एक नवीन खातं तयार केलं आहे. आपल्या देशाला सहकाराचा मोठा वारसा असल्याचं सांगत केंद्र सरकारनं सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर राज्यातील साखर कारखाने उभारतात. या साखर कारखान्यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती झाली आहे.

केंद्रात सहकार खातं तयार झाल्यावर या खात्याचा कारभार भाजप नेते नितीन गडकरी यांच्याकडे येईल असं सर्वांनाच वाटत होतं. कारण नितीन गडकरी महाराष्ट्रातील आहेत आणि त्यांना सहकाराची चांगली जाण आहे.

नितीन गडकरी सतत साखर कारखानदारी बद्दल आपली मतं मांडत असतात. आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी नितीन गडकरी यांना ओळखण्यात येतं.

आताही असंच वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. मागच्या जन्मात पाप केलेला माणूस एकतर साखर कारखाना काढतो नाहीतर वर्तमानपत्र काढतो, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

राज्यातल्या सहकार चळवळीचं मुल्यमापन करायचं झाल तर ग्रामीण भागातील जनतेवर याचे काय परिणाम झाले याचे मापण केले तर आपल्याला सहजपणे समजू शकतं, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

सहकारी क्षेत्रामुळं आपला ग्रोथ रेट वाढण्यास मदत होते. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात सहकार क्षेत्राचा ग्रोथ रेट चांगला आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.

पुणे, नाशिक या भागात वेगळा तर विदर्भात वेगळा ग्रोथ रेट पहायला मिळत असल्याचं गडकरी म्हणाले आहेत. सहकार क्षेत्राबाबत गडकरी यांनी अगदी समर्पक शब्दात आपली मतं मांडली आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला 110 वर्ष पुर्ण झाल्या निमित्त गडकरी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गडकरी यांनी विदर्भातील सहकाराच्या विकासावर देखील भाष्य केलं आहे.

दरम्यान, नितीन गडकरींच्या साखर कारखानदारांबद्दलच्या वक्तव्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आपल्या बेधडक वक्तव्यानं गडकरी यांनी पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांना हसायला भाग पाडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“सरकारमध्ये कोणाशी बोलायचं हे राज ठाकरेंना चांगलंच माहितीये”

“देशाला 1947 मध्ये भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं”

  फडणवीस म्हणाले ‘डुकराच्या नादी लागायचं नाही’, आता नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर

  ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात”