मुंबई | राज ठाकरे यांनी केलेल्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. अनेक पक्षांनी राज ठाकरे यांवर टीका देखील केली आहे.
अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे.
मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही. आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करता आहेत, अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरणार. जर अमित ठाकरेंनाच हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला?, असा सवाल देखील सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
महाविकास आघाडीने आता पुरोगामित्वाची चादर पांघरली आहे. त्यामुळे आताच राज ठाकरे यांच्यावर कारवाई करा, असा सल्ला देखील त्यानी यावेळी दिला आहे.
मशिदीच्या बाजूला भोंगे लागतील या वक्तव्यावर आक्षेप आहे, कारवाई व्हायला हवी. संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करु नका, असा सल्ला देखील सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जगाचं टेन्शन वाढलं! कोरोनानंतर आता Rhinovirus एन्ट्री; डाॅक्टर चिंतेत
Sharad Pawar: राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार?, शरद पवार म्हणाले…
Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…