‘…म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला’; फडणवीसांनी सांगितलं कारण

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण दिलं होत. पण मागील चार पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्र पाहतोय. या घटना पाहिल्यानंतर सरकारने संवादासाठी जागा ठेवली आहे असं वाटत नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

जर कोणी हिटलरी प्रवृत्तीने वागायचं ठरवलं असेल तर त्यांच्या संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, अशी आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

मुळातच विरोधी पक्षाला संपवायचं अशी प्रवृत्ती जर सरकारमध्ये असेल आणि सरकारी पक्षाचे लोक पोलिस संरक्षणामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देत असतील तर बैठकीला जाऊन फायदा काय?, असा हल्लाबोल देवेंद्र फडवणवीसांनी केला.

विरोधी पक्ष भ्रष्टाचारावर बोलत असल्यामुळे जीवे मारण्यासाठी हल्ला करत आहेत. आम्ही पोलखोल यात्रा काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून सर्व भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर मांडला, असंही त्यांनी सांगितलं.

लोकशाहीमध्ये यापेक्षा वेगळं काय करायचं असतं?, असा सवाल करत ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

आमच्या पोलखोल रथांवर हल्ले केले त्यांना असं वाटत असेल की, हल्ले करून भ्रष्टाचाराच्या विरूद्ध बोलणं आम्ही थांबवू. मात्र त्यांनी हा गैरसमज मनातून काढून टाकावा, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

दरम्यान, राज्यात पोलिसांचा मोठा दुरूपयोग केला जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. मुंबईमध्ये जे सुरू आहे ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी खालच्या जातीची आहे म्हणत मला जेलमध्ये पाणी दिलं जात नाहीये”

  ‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर…’; संजय राऊतांचा हल्लाबोल

  ‘राष्ट्रपती राजवट लागू करा…लै मजा येईल…’; राष्ट्रवादीच्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

 येत्या पाच दिवसांत ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

  “भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे….”