मुंबई | आज राज्यातील वातावरण चांगलंच पेटल्याचं पहायला मिळथ आहे. सत्तादारी आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार कलगितुरा रंगला आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट अनिधिकृतपणे बांधले असून ते तोडण्याची मागणी किरीट सोमय्यांकडून होत आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात खूप काही पहायला मिळालं. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण तापलेलं आहे.
किरीट सोमय्यांच्या आरोपांवर आणि त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोणालाही कुठली लढाई लढायची असेल तर कायदेशीर लढली पाहिजे, कुणीही कायदा हातात घेतला तर त्या सबंधात पोलीस नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ती करतील., असं वळसेपाटील यांनी म्हटलं आहे.
खोटे नाटे आरोप करायचे. केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, जो संबंध नाही तो जोडायचा आणि त्यामधून सरकारची प्रतिमा चुकीची बनवायची, असं दिलीप वळसे म्हणाले आहेत.
किरीट सोमय्या यांच्यादौऱ्याला एवढं महत्व देण्याचं कारण नाही. कोण कुठं जातंय याचा ट्रॅक नाही ठेवतं, असंही वळसेपाटील म्हणाले.
स्थानिक पोलीस कायद्याप्रमाणे काम आणि कारवाई करतील, असे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
“माझ्या हत्येचे कटकारस्थान रचले जात आहे”
“आता बाॅलिवूड, टाॅलिवूड म्हणण्याऐवजी ‘इंडियन फिल्म इंडस्ट्री’ म्हणावं”
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं चित्रपटसृष्टीला ठोकला रामराम
“ठाकरे साहेब, तुम्हाला जेलमध्ये टाकायला तुमची परवानगी घेणार नाही”