मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावरुन सध्या राज्यातील वातावरण जोरदार तापल्याचं पहायला मिळत आहे.
मुंबईत येऊन मातोश्रींवर हनुमान चालीसा पठन करणार असं राणा दाम्पत्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे इथं यायची कोणी धमकी देत असेल तर शिवसैनिक शांत बसणार नाही, असं म्हणत शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुंबईत पोहचूनही अद्याप राणा दाम्पत्य मातोश्रीवर पोहचले नाहीत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
मुंबईत राडा होऊ नये म्हणून खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना 149 ची नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता वातावरण आणखीनच चिघळत चालल्याचं दिसत आहे. याविषयी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बंटी आणि बबली पोहोचले असतील तर पोहोचू द्या. हे लोक फिल्मी लोक आहेत. ही स्टंटबाजी, मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. आणि भाजपाला आपलं मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज लागत आहे, असं राऊत म्हणाले.
हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व काय आहे हे माहिती आहे. या श्रद्धेच्या गोष्टी आहेत, असंही राऊत म्हणाले.
कोणाला स्टंटच करायचे असतील तर करु द्या, त्याने काही फरक पडणार नाही. त्यांना शिवसेनेचं मुंबईचं पाणी काय आहे याची अजून माहिती नाही. आमचे शिवसैनिक सक्षम आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! राणा दाम्पत्यांमुळे मुंबईत मोठा ड्रामा, शिवसेना आक्रमक
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, पाहा काय बदल झाला
रशिया-युक्रेन युद्ध आणखी पेटणार! समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण
‘शिवसेनेसोबत मैत्री जपली असती तर कदाचित….’; राऊतांचे भाजपला खडेबोल
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या टुकडे टुकडे गँगला शरद पवारांनी आवरावं”