‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय’; गिरीश महाजनांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नाशिक | अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिराच्या भूमीपूजनावरून देशात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं आहे. सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यरोपाच्या खेळी चालूच आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आता राम मंदिर भूमीपूजनाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं औचित्य साधून नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या पूर्वेला काल प्रतिमापूजन करण्यात आलं. प्रतिमापूजनाला महाजन यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. प्रतिमापूजन झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी आपलं मत व्यक्त केलं.

राम मंदिर भूमीपूजनासाठी अयोध्येला जायचं की नाही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेहमीच द्विधा मनःस्थितीत असल्यामुळेच त्यांनी इ भूमीपूजनाचा मार्ग काढला. या संपूर्ण सोहळ्यात शिवसेनेची अवस्था ‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे, असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनाला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकारी पक्षाने ठाकरे यांनी अयोध्येला जाऊ नये अशी वक्तव्य केली होती. त्यामुळे ठाकरे यांना जरी राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण आले असते तरी ते गेले असती की नाही याबाबत शंका आहे. दोन्ही पक्षांना सांभाळायची कसरत करावी लागल्याने मुख्यमंत्र्यांची चांगलीच फजिती झाली आहे, अशीही टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंंत्री उद्धव टाकरेंना केला फोन; म्हणाले…

भारतरत्न लतादीदींनी राम मंदिराचं श्रेय दिलं ‘या’ दोन महत्वाच्या नेत्यांना!

अयोध्येत राम मंदिराचं काम सुरु; आता पाकिस्तानात सुरु झाली कृष्ण मंदिर बांधण्याची मागणी

सुनेला भूतबाधा झाल्याच्या संशयावरून सासरच्या माणसांनी तिच्यासोबत केलं असं काही की…

रक्षाबंधन दिवशी बहिणींनी ओवाळले अन् भावाने ओवाळणीत दिले आपले प्राण