फुकट दिलं तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे, त्यामुळे…- नितीन गडकरी

नागपूर | नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) एका कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. फुकट दिलं, तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते ऍग्रोव्हिजन (Agro-Vision) कृषी प्रदर्शनाच्या (Exhibition) कार्यक्रमात बोलत होते.

फुकटंच कुणाला काहीच द्यायचं नाही, नाही तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे. त्यामुळेच कृषी प्रदर्शनात यायला मोफत बसेस दिल्या नाही, असं नितीन गडकरी यावळी म्हणालेत.

नागपुरात नितीन गडकरींच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोप आज करण्यात आला. या समारोप कार्यक्रमाला नितीन गडकरींती प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नितीन गडकरींनी संबोधित करताना कृषी प्रदर्शनाच्या आयोजकांना उद्देशूनच महत्त्वाचं वक्तव्य यावेळी केलं आहे.

कृषी प्रदर्शनासाठी मोफत बस मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ती काही मान्य करण्यात आली नव्हती. असं नेमकं का करण्यात आलं, त्याचं उत्तर नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात बोलताना दिलं आहे.

कृपी प्रदर्शनासाठी यायला लोकांना सोयीचं जावं, यासाठी मोफत बस सेवा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र तसं केलं तर लोकांना या कृषी प्रदर्शनाची किंमत उरणार नाही, असं म्हणत नितीन गडकरींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती आणि आधुनिक शेतीबाबतही अनेक गोष्टी माहीत झाल्या असल्याचा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

शेतीतील नवनव्या तंत्रज्ञानाबाबतही या प्रदर्शनातून प्रबोधन करण्यात आलं होतं. यासोबत नागपुरात तेलंखडी गार्डन परिसरात ऍग्रो कन्वेशन सेंटर तयार करणार असल्याची माहितीही यावेळी नितीन गडकरी यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

डाॅ. रवी गोडसे म्हणतात, “Omicron म्हणजे Nonsense” 

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी घातल्या ‘या’ जाचक अटी

लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत