औरंगाबाद | हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? भाजपा जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. म्हणून मी संघावर टीका केली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ते औरंगदाबादमध्ये सभेत बोलत होते.
भाजपने आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असं नाही. आमचा संयम सुटला तर तेही करू, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील, असंही ते म्हणाले.
निवडणुका जिंकायच्या म्हणून घाईत औरंगाबाद मेट्रो आणि इतर विकास कामांची घोषणा करणार नाही. व्यवस्थित नियोजन करून आराखडा तयार करणार आणि मगच विकास करणार आहे. विकासाच्या नावावर शहर उद्ध्वस्त करणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
दरम्यान, मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये आहे- उद्धव ठाकरे
“मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायचीये”
“किरीट सोमय्यांनी परत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर थोबाड लाल करू”
“…तर मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही”
लेडी सचिनचा क्रिकेटला अलविदा; मिताली राजची निवृत्तीची घोषणा