मुंबई | बर्थडे म्हटलं की केक कापणे, पार्टी, मजामस्ती या सर्व गोष्टी आल्याच. साधारणतः बहुतेक बर्थडेजला या गोष्टी केल्या जातात. मात्र, काही लोकांना या गोष्टी कंटाळवाण्या वाटतात. त्यांना आपल्या बर्थडेला यापेक्षा हटके काहितरी करायचं असतं.
आपल्या बर्थडेला असंच काहीतरी हटके करू इच्छिणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये ही तरुणी आपल्या बॉयफ्रेंडकडे वाढदिवसानिम्मित काहीतरी सॉलिड प्लॅन करण्याची मागणी करत आहे.
आपल्या बर्थडेवरून ही तरुणी बॉयफ्रेंडवर प्रचंड चिडलेली दिसत आहे. दरवेळी जसं सेलिब्रेशन केलं जातं तसं सलिब्रेशन मला नको, असं ती आपल्या बॉयफ्रेंडला बोलत आहे.
यावेळी जर काही हटके प्लॅन केला नाही तर मी केकच कापणार नाही. तो केक मी तुझ्या चेहऱ्यावरच फेकेल, अशी धमकीच ती आपल्या पार्टनरला देत आहे. तिच्या या धमकीवर तिचा बॉयफ्रेंड तिला चिडवत तिची माजा घेताना दिसत आहे.
या तरुणीचा बॉयफ्रेंड तिला मी तुझ्या बर्थडेला काय प्लॅन करू? असा सवाल करतो. तर यावर देखील ही तरुणी उत्तर देत नाही. ती बोलते ही गोष्ट देखील मीच सांगायची का? मी तुझ्या बर्थडेला तुला विचारून प्लॅन करते का?
यावेळी ही तरुणी रडताना दिसत आहे. यानंतर तरुण प्रचंड गोंधळून जातो. बर्थडेला नेमका काय प्लॅन करावा, हे तिला समजत नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये फक्त तरुणीचा चेहरा दिसत आहे. तिच्या बॉयफ्रेंडने हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
दरम्यान, xiampatientwolf नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओतील तरुणीचं प्रेमळ बोलणं नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
सेटवर राखीला चावला कुत्रा, राखी म्हणतेय मी देखील त्याला चावणार; पाहा व्हिडीओ
रिंकू राजगुरुचा आपल्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…
धक्कादायक! बिग बाॅसच्या घरात हाणामारी, घरातून स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता
कोरोना काळात ‘अशी’ वाढवा लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती!
खासदार नुसरत जहाँच्या घरी चिमुकल्याचं आगमन!