“आज मा.बाळासाहेब असते, तर पहिले आमंत्रण देवेंद्र फडणवीसांना दिले असते”

मुंबई |  आज 31 मार्च रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपुजन सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा संध्याकाळी 5 वाजता दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या भूमिपूजन सोहळ्याच आमंत्रण विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न आल्याची माहीती समोर आली आहे. याच मुद्यावरून भाजप आणि शिवसेना पक्षामध्ये वादाची ठिंणगी पडली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षाचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज मा.बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी पहिले आमंत्रण विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असते, असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच ह.ल्लाबोल केला आहे.

यासंदर्भात नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे मनाचा मोठा माणूस होता. रोजा होण्यासाठी मोठं मन लागतं. मात्र त्यांच्यानंतर फक्त मोठे किस्से आहेत, मन खूप लहान झाली आहेत, असा खोचक टोलाही नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकच्या भूमीपुजनाला आमंत्रण दिले नाही. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही ठाकरे सरकारवर हल्ला.बोल केला.

यासंदर्भात भातखळकर यांनीही आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यांत त्यांनी निमंत्रण पत्रिकेतून हिंदुहृसंम्राट गायब, एमएमआरडीए चे मंत्री एकनाथ शिंदे गायब, तसेच ज्यांच्यामुळे शिवसेनाप्रमुखाचे स्मारक शक्य झाले ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गायब, असं म्हटलं आहे. आमंत्रण पत्रिकेवर नावं फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची आहे, असंही अतुल भातकळरांनी म्हटलं आहे.

तसेच या भूमीपुजनाच्या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर आणि काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे उपस्थीत राहणार असल्याची माहीती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी…

“सोडलेल्या हिंदूत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा…

‘…तर सचिन तेंडुलकर, लक्ष्मण, गांगुली कधीच खेळू…

“आणखी 15 दिवस तरी राज्यात लॉकडाऊन लावला जाणार…

“आधी बुडणाऱ्या रोजगारांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक…