मुंबई | सध्या राज्यात अनेक घडामोडी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसत आहे. तसेच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांमध्ये आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगलेली आपल्या दिसत आहे.
अशातच बेळगावमध्ये मराठी लोकांवर होणारे ह.ल्ल्यांवर शिवसेनेच्या अग्रलेखातून आज भाष्य करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र येऊन या ह.ल्ल्याचा प्रतिकार केला पाहिजे, असं शिवसेनेने अग्रलेखात म्हटलं आहे.
आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करतो की त्यांनी बेळगावामध्ये मराठी लोकांवर होणाऱ्या अ.त्याचारावि.रोधात आवाज उठवा, मराठी माणसाला न्या.य द्या. कर्नाटक आणि दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जा, अशी मागणी शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
बेळगावातील मराठी माणसांवर होणारे अ.त्याचार थांबत नसतील, तर केंद्र सरकारने संपूर्ण सीमा भागास केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावं, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.
मराठी भाषिकांच्या दुकानांवरील उचकटून टाकणे, मराठी नंबरप्लेट असणाऱ्या गाड्यांवर ह.ल्ले करणे, मराठी तरुणाने स्टेटसवर मराठी स्टेटस ठेवले म्हणून त्यांना अमानुष मा.रहा.ण करणे, तसेच ‘मराठी भाषिक वाघ आहेत’ अशा प्रकारच्या स्टेटसवर अक्षेप घेऊन जु.लूम करणे हे अमानुष आणि लोकशाहीविरोधी आहे.
बेळगाव महापालिकेवरील भगवा झेंडा उतरवून तेथं त्या कन्नड रक्षण वेदिकवाल्यांनी लाल-पिवळा झेंडा लावला. त्यावरुन मराठी तरुण आणि कानडी पोलीस यांच्यामध्ये झटापटी झाली. त्यामध्ये मराठी तरुणांना गु.न्हेगार ठरवले गेले. हे गेल्या सत्तर वर्षापासून सुरु आहे. आताही दोन दिवसापूर्वी शिवसेनेच्या जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीवर ह.ल्ला करण्यात आला. फार मोठे शौर्य गाजवण्यात आले, या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये.
या सर्व प्रकरणी महाराष्ट्राने संयम सोडला तर कानडी राज्यास जबरदस्त अशी अर्थिक आणि इतर किंमत मोजावी लागेल, असा आ.क्रमकतेचा इशारा शिवसेनेने सामना अग्रलेखातून दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांत ‘बेळगाव पुन्हा महाराष्ट्रात आणणारच’ असं मजबूतीने जाहीर केलं आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र जे बोलतो ते करुनच दाखवतो, असंही शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-