सिंधुदुर्ग | भाजप आमदार नितेश राणे यांना सध्या शिवसैनिक हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणाऱ्या संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची निवडणूक सर्वत्र गाजली आहे. राज्यातील सर्वाधिक गाजलेली सहकारी बॅंक निवडणूक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे पॅनलप्रमुख सतिश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये हल्ला झाला होता. परिणामी राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती.
संतोष परब यांच्या तक्रारीवरून भाजप आमदार नितेश राणें आणि त्यांंच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती.
अखेर दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशात आता नितेश राणेंच्या तब्येतीत बिघाड झाला आहे.
न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावल्यावर त्यांच्या वकीलांनी राणेंच्या तब्येतीबाबत न्यायालयाला कळवलं होतं. परिणामी राणेंच्या विनंतीवरून त्यांना सावंतवाडी कारागृहाऐवजी ओरोस येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ओरोस जिल्हा रूग्णालयात कार्डियाक सुविधा उपलब्ध नसल्यानं नितेश राणेंना कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात हलवण्यात येणार आहे. राणेंना रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याची माहिती मिळत आहे.
पडवे मेडिकल काॅलेजचे डाॅक्टर नितेश राणेंना देखरेखीखाली कोल्हापूरला नेणार आहेत. 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेमधून नितेश राणेंना कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. परिणामी सध्या या डाॅक्टरांसह पोलिसांची देखील चिंता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
‘या’ महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपणार; ICMR ने दिली महत्वाची माहिती
“तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर…”
काळजाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणाचं गूढ उकललं!
“राज्यात सत्ता आमचीच तरी नितेश राणेंसाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवला”